निबंध मंथन (विचारांचे मंथन):
‘निबंध मंथन’ हे लेखनाच्या माध्यमातून विचारांचे मंथन करण्याचे एक व्यासपीठ आहे. उत्कृष्ट निबंधांचे पुस्तिकेच्या रूपात प्रकाशन केले जाते. सन २०१९ मध्ये एकूण १२३० निबंध प्राप्त झाले. हे निबंध प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवक, गृहिणी आणि कामकाजी महिलांकडून प्राप्त होतात.
चर्चा गट (विचारमंथनासाठी समूह):
- पुण्यात १० ते १५ युवक पाच गटांमध्ये दर आठवड्याला एकत्र येतात, 'विचारवेध' यूट्यूबवरील(Youtube) भाषणांवर चर्चा करतात आणि त्यावर आपल्या चिकित्सक प्रतिक्रिया व्यक्त करतात.
- ही उपक्रम २०२२ मध्ये महाराष्ट्रातील किमान दहा शहरांपर्यंत विस्तारित करण्याचा मानस आहे.