राष्ट्रहितासाठी १०० टक्के मतदान …..!

भारत निवडणूक आयोगाने 2019 चा सतराव्या लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण भारतामध्ये 11 एप्रिल ते 19 मे या दरम्यान विविध टप्प्यामध्ये होत आहे. या निवडणूकणाचा 23 मे रोजी निकाल जाहीर होऊन या प्रक्रियेतून या देशाचा राजा निवडला जातो. या निवडणूक प्रक्रिये मध्ये 90 करोड मतदाता सहभागी होणार आहेत. मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त संखेने सहभागी व्हावे या करिता आवाहन केले असून दरम्यान सुटयांचाची योग साधला आहे. परंतु मतदारांनी सुट्ट्याचा मोह बाजूला करून लोकशाहीच्या सवर्धंनासाठी मतदान हक्क बजावण्यासाठी, मतदाना पासून कोणी वंचित राहणार नाही आणि नोटा प्रयोग होणार नाही याची खबरदारी घेण्याची अवशकता आहे.

*नोटा म्हणजे काय ?*
Non for above अर्थात निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारा पैकी कोणीच नाही किवा नकारात्मक मतदानाचा अधिकार. नोटासंबंधी पीपल्स युंनियन फॉर सिविल लिबर्टीज संस्थेने सर्वोच्च न्यायालय मध्ये कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स १९६१ मधील नियम ४१ (२) आणि (३) अंतर्गत जनहित याचिका सादर केली होती. २७ सप्टे २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नोटा अधिकार मान्य करण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाला आदेश दिला. आणि २०१५ पासून निवडणुकी मध्ये ईविएमच्या पॅडवर सर्वात खाली नोटा चिन्ह नमूद केले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदारला नोटाचा अधिकार मिळाला असलातरी या अधिकाराचा मतदारांनी किती वापर करावा हे ठरवले पाहिजे . नोटा पेक्षा available best निवडणे केव्हाही चांगले आहे. गेल्या २०१७ च्या गुजराथ, हरियाणा, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाचा प्रयोग होऊन एकट्या गुजरातमध्ये ५.५ लाख मतदारांनी नोटा वापरला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश ४.१५ लाख, तेलंगणा २.३ लाख राजस्थान ४.३८ लाख, छत्तीसगड १.७८ लाख, मिजोराम ३ हजार मतदारनी नोटा चा प्रयोग करून जवळपास १२.५० लाख मतदारांनी नोटा वापरला आहे. त्यामुळे चांगले उमेदवार फार कमी मठाच्या फरकाने पराभूत झालेत. त्यामुळे नोटा करणे म्हणजे धृतराष्ट्र होण्यासारखे आहे.

*Analable Best निवडणे योग्य*
आजकाल सर्व समाजाची परिस्थिति आणि वातावरण पाहता सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तींचे प्रमाण कमी झाले आहे. आणि राजकरणात तर हे प्रमाण फारच कमी जाणवते. त्यामुळे उभ्या असणार्‍या उमेदवारांपैकी जो उमेदवार योग्य वाटतो त्यांना मतदान करणे आणि त्यांना निवडून आणणे हे योग्य ठरते. कारण नोटाचा वापर केला तर उभ्या असणार्‍या उमेदवारा पैकी चांगल्या उमेदवारा चे विरोधात मतदान जाऊन शेवटी याचा फायदा जोचांगला नाही त्यांनाच होतो त्यामुळे आपले, आपल्या पुढील पिढीचे आणि देशाचे भविष्य बिघडण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे उज्वल भविष्यासाठी आणि कणखर देशासाठी सर्वांनी मतदान करणे आणि नोटा न करणे योग्य..

अशोक राणे

स्तंभ लेखक, सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन.

About Author

अशोक राणे

अशोक राणे
स्तंभ लेखक, सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन.

Leave a Comment