मनोगत

विचारवेध
“विचारवेध” ची सुरुवात करतांना आपल्या team च्या मनात असंख्य विचार सुरू होते. विचार जसे की, आपल्या चळवळीचे नाव काय असावे… इथ पासून तर अगदी भविष्यातील वाटचाली पर्यंतचे असंख्य विचार..

उद्देश मात्र पक्का होता आपला विचार वाचकांपर्यंत पोहोचावा. आपला विचार म्हणजे आपल्या मातीचा विचार, आपल्या जीवन मूल्यांचा विचार, आपल्या राष्ट्र जीवनाचा विचार, आपल्या निसर्गाचा विचार, तो विचार जो समुद्रासारखा अथांग आहे, ज्यात सर्व सामावून घेण्याची आणि नको असलेले, अशुद्ध असलेलं, निर्जीव असलेलं बाहेर फेकण्याची ताकद आहे तो विचार. आपल्या विचारांच शुद्धीकरणही व्हावं, नदी ज्याप्रमाणे वाहत जातांना शुद्ध होत जाते अगदी तसच आपल्या विचारांच व्हाव. तो जसा शुद्ध व्हावा तसाच तो अधिक पक्का व्हावा आणि त्यावरची श्रद्धा वाढावी हाही उद्देश.

कारण आपला मातीचा विचार, हा कणखर आहे, मनभरही आहे, चिरंतन आहे, तो मातीतून उभा करणाराही आहे आणि मातीत घालणाही आहे. म्हणून हा बळकट करण्यासाठी आपण “विचारवेध” हि चळवळ सुरू करत आहोत.
आपली चळवळ हि अक्षय राहावी त्याचा कधी क्षय होऊ नये यासाठी आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्त निवडला. आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण जो यज्ञ पेटवतो आहे त्याचे पुण्य फळ हे अक्षय राहावे आपल्या सर्वांच्या सोबतीने ते अधिकाधिक निर्मळ व्हावे या करिता हा ” विचारवेध ”

– टीम विचारवेध.