आमच्या विषयी

आम्ही एकत्रीत येऊन आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी असे एक संकेतस्थळ चालवायचे ठरवले आहे की जे आपल्या भारतीय समाज मनाविषयीच्या विविध क्षेत्राची सकारात्मक मांडणी करेल. जामध्ये शिक्षण, साहित्य, आरोग्य, खेळ, समाजकारण, राजकारण,अर्थकारण,पर्यावरण, शेती, उद्योग,कला, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्राची सकारात्मक मांडणी करेल. इन्टरनेटच्या मोठ्या विश्वात उत्तम, दर्जेदार, वैचारिक व सकारात्मक लेखन वाचण्याची व लिहिण्याची हक्काची जागा म्हणजे विचारवेध राहील असा आमचा प्रयत्न आहे.

 

नितीन राजवैद्य.
मुख्य संपादक विचारवेध.

पत्रकारिते मध्ये शिक्षण झाले आहे. विद्यार्थी दशेमध्ये असतांना विद्यार्थी चळवळीमध्ये अनेक वर्ष कार्य केले असून त्यावेळी त्यांनी अनेक शैक्षणीक प्रश्नाला धरून विविध आंदोलन केले.सध्या विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व आध्यात्मिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आहे.

 अड्.विजय भांबेरे,
संपादक ‘विचारवेध’.

महाविद्यालयीन जीवनात असतांना चळवळीच्या माध्यमातून शैक्षणिक आणि राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभाग घेतला. कायद्यामध्ये स्नातकोत्तर शिक्षण पूर्ण केले असून सध्या व्यवसायाने वकील आहे. या सोबतच राज्यशास्त्र, इतिहास,साहित्याचे अभ्यासक आहे.

प्रसाद गणोरकर
संपादक विचारवेध

“विचारवेध” चे संपादक म्हणून काम पाहत आहे. माझे वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयात शिक्षण झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी असतांना अनेक शैक्षणिक आंदोलना मध्ये सहभाग घेतला सध्या वाणिज्य व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आहे.

प्रशांत तायडे

संपादक, विचारवेध.

संगणक क्षेत्रात शिक्षण व नोकरी. विद्यार्थी जीवनात विद्यार्थी आंदोलणे, विविध सामाजीक व राजकीय चळवळी तसेच संघटनांमध्ये काम केले आहे. सध्या संगणक विषयक नोकरीमुळे भारतात व युरोपात प्रवास करत असतो. विविध लोकांना भेटणे, वेगवेगळ्या समाजातील लोकांशी संवाध साधायला आवडते. सायकल व एकूणच फिटनेसबाबत जागरूक व आग्रही असून अनेक सायकल भ्रमंती केल्या आहेत. त्यासोबत पर्यावरणपुरक उपक्रमांचे आयोजन व सहभागी होण्याची आवड आहे.